चंद्रपूर :- ९ ऑक्टोबर रोजी ईद-ए- मिलाद असल्याने या निमित्त चंद्रपूर शहराच्या मुख्य रस्त्यांवरून शोभायात्रा काढण्यात आली होती. यात्रेनंतर रस्त्यांवर कचरा जमा झाल्याने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रॅली संपताच सदर रस्ते स्वच्छ करण्यात आले.
कोनेरी मैदानापासून सुरू झालेली रॅली गीरनार चौक,गांधी चौक,जटपुरा गेट ते कस्तुरबा मार्गे गीरनार चौक, कोनेरी ग्राउंडपर्यंत असा या रॅलीचा मार्गक्रम होता. मार्गात अनेक ठिकाणी शरबत व अल्पोपहाराचे आयोजन केले गेले असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा जमा झाला होता.
रॅलीचा मार्गक्रम मोठा असल्याने रॅली नंतर रोड सफाई चे काम सुरू करण्यात आले. तसेच सकाळी मुख्य रस्ते व वॉर्ड ज्या ठिकाणी कचरा पडलेला होता त्या ठिकाणी सफाईची कामे करून देण्यात आली याकरिता मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता भासल्याने कंत्राटी कामगार लावुन स्वच्छता करण्यात आली.