संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील एकही बालक जंतनाशक औषधीपासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य विभागासह इतर विभागाच्या सहाय्याने 10 ऑक्टोबर ला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम यशस्वी करा असे आवाहन कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी केले आहे.
केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामठीत 10 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम आठवडाव 17 ऑक्टोबर रोजी मॉप अप दिन राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्याचे आरोग्य चांगले ठेवणे,पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. तेव्हा ही राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम यशस्वी करा असे आवाहन मुख्याधिकारी संदीप बोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने, वैद्यकिय अधिक्षक डॉ नैना धुमाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी केले आहे.