नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी जनतेच्या तक्रारी, अडचणी जाणून घेतील.
तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तरांच्या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच तयार करुन सोबत आणावेत. तक्रारकर्त्याने आपले निवेदन सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.