हत्तीच्या कळपाने एकाचा मृत्यू

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

 जख्मी झालेला हत्ती पळवणे आले जीवावर..

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात २४ सप्टेंबर पासुन गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात वास्तव्य असलेल्या हत्तीचा कळप गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल झालेला आहे. हा कळप आज सकाळी या तिडका/येरंडी जंगल परिसरातून नवेगाव बांध नेशनल पार्क कडे जात असताना त्या परिसरातील ३४ ते ४० लोकांनी हत्तीचा कळप आपल्या शेतातील पीक खराब करू नये या करिता त्या हत्तीचा कळप पळविण्याचा पर्यटन करत असताना त्या हत्ती च्या कळपाने पाठलाग करत असलेल्या लोकांवर हल्ला केला. असून त्या हल्ल्यात दोन जण त्या हत्तीच्या हल्ल्यात आले असुन त्या पैकी एकाच मृत्यू झाला असुन मृतक सुरेंद्र कळइबाग ५२ वर्ष रा. तिडका असा आहे व जखमी जोरुशींग पोरेटी ५० वर्ष असे आहे. जखमी झालेल्या इसमाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. तर याची माहिती वन विभागाला मिळताच वनविभागाची टीम घटना स्थळी पोहचली असुन मृतकाचा मृत देह साविच्छेदना करीता पाठवले आहे, तर त्या हत्ती च्या कळपा वर नजर ठेऊन असल्याचे नवेगावबांध येथील RFO दादा राऊत यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

Wed Oct 5 , 2022
नागपूर :-  विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, ‍दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विभागीय आयुक्त  विजयलक्ष्मी बिदरी जनतेच्या तक्रारी, अडचणी जाणून घेतील. तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तरांच्या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच तयार करुन सोबत आणावेत. तक्रारकर्त्याने आपले निवेदन सकाळी 11 ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com