संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 18 :- कामठी तालुक्यात कृष्ठरोग शोध अभियान व सक्रिय क्षयरुग्ण शोध 2022 ही मोहिम तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने , सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी डॉ धिरेंद्र सोमकुवर , कृष्ठरोग तंत्रज्ञ मनोहर येळे व कमलेश गजभिये यांच्या नेतृत्वात 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.या मोहिमे अंतर्गत तालुका आरोग्य विभागातर्फे नेमुन दिलेले आरोग्य विभागत 203 प्रशिक्षित आरोग्य पथके व 40 पर्यवेक्षकाना एकूण 56 हजार 672 घरामध्ये जाऊन घरातील सर्व लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट असून यानुसार आशा वर्कर घरोघरी जाऊन घरातील सदस्यांची कृष्ठरोग तसेच क्षयरुग्ण तपासणी करीत आहेत.
या मोहिमे अंतर्गत कामठी तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील 2 लक्ष 69 हजार 483 लोकसंख्येची प्रत्यक्ष तपासनी करण्यात येत आहे. समजातील निदान न झालेले कृष्ठरोग लवकरात लवकर शोधून त्यांना बहुविध औषधोपचारासाठी आणणे , नवीन सांसर्गिक कृष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे,समाजात कृष्ठरोगाविषयी जनजागृती करणे आणि कृष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कृष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे या मोहिमेचा उद्देश आहे तेव्हा 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग व कृष्ठरोग संयुक्त शोध मोहिमेत घरी येणाऱ्या आशा वर्कर व स्वयंसेविकांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने यांनी केले आहे.
कृष्ठरोगाची लक्षणे-त्वचेवर फिकट/लालसर बधिर चठ्ठा,त्याठिकाणी घाम येणे,जाड, बधिर ,तेलकट चकाकणारी त्वचा,त्वचेवर गाठी असणे,कानाच्या पाळ्या जाड होणे,भुवयांचे केस विरळ होणे,डोळे पूर्ण बंद करता न येणे आदी आहे.