पुजा कावळे हत्याकांडातील पतीनेच रचला पत्नीच्या खुनाचा कट, आरोपीतांना यवतमाळ जिल्हा पोलीसां 72 तासाच्या आत केले जेरबंद.

यवतमाळ.-दि.10/11/2021 रोजी मृतक नामे सौ. पुजा अनिल कावळे वय 28 वर्षे रा. शेलोडी ता. दारव्हा जि. यवतमाळ ह.मु. वाई-गौळ ता.मानोरा जि. वाशिम ही सायंकाळी 5.30 वा. पुणे जाणे करीता घरुन निघाली परंतु ती पुणे येथे पोचली नाही. त्यामुळे फिर्यादी नामे भोजराज पंजाबराव वानखडे यांचे तक्रारी वरुन हरविलेले ईसम रजि.क्र. 48/2021 अन्वये पोलीस स्टेशन्न दिग्रस येथे मिसिंग दाखल करुन तीचा कसोशीने शोध घेण्यात आला.

शोधदरम्यान दि. 16/11/2021 रोजी सावंगा शेतशिवारात एका अनोळखी महिलेचे प्रेत संपुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मिळुन आल्याची खबर पोलीस स्टेशनला प्राप्त होताच पोलीसांनी त्वरीत घटनास्थळ गाठून्न घटनास्थळी भेट दिली, व सदर मृतदेहाची ओळख पटविली असता तो मृतदेह हा हरविलेल्या पुजा अनिल कावळे हिचाच असल्याचे न्निष्पण झाले त्याचप्रमाणे मृतक पुजा अनिल कावळे हिचा कोणीतरी अज्ञात ईसमाने खुन केला हे सुध्दा निष्पन्न झाले व पोलीस स्टेशन्न दिग्रस येथे  कलम 302 भा.द.वी. प्रमाणे खुणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेउन मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. दिलीप पाटिल-भुजबळ यानी सदर गुन्हयात पोलीस स्टेशन स्तरावरील एक पथक, स्थानिक गुन्हे शाखेतिल दोन पथक व सायबर सेल येथील एक असे एकुण चार पथक त्वरीत गठित करुण त्याना सदर गुन्हयाचासमांतर तपास करुण गुन्हा उघडकिस आणुन आरोपीतांना अटक करण्याचे आदेश दिले.

मृतक नामे सौ. पुजा अनिल कावळे वाई-गौळ ही सायंकाळी 5.30 वा. पुणे जाणे करीता घरुन निघाली परंतु ती पुणे येथे न पोहचता तिचा खुन होउन मृतदेह मिळून येणे हे फार संशयास्पद होते परंतु सदर गुन्हयामध्ये घटणास्थळी कोणताही ठोस असा भौतिक पुरावा उपलब्ध किंवा सुगावा उपलब्ध  नव्हता त्यामुळे पोलीसांसमोर या क्लिष्ठ गुन्हयाची उकल करण्याचे एक मोठे आव्हान्न होते.  अशातच पोलीस पथकांनी अतिशय संयम बाळगत मृतक संबंधित गोपनीय माहिती संकलीत करण्यास सुरूवात केली व सोबतीला या गोपनीय माहितीची शहनिशा आपल्या तांत्रिक निकषावर तपासुन पाहिल्या व यातुनच गुन्हयाची हळुहळु उकल होत गेली सदरचा गुन्हा हा 4 आरोपीतांनी केला असुन त्यापौकी आरोपी नामे (1) उज्वल पंढरी नगराळे वय 22 रा. राळेगाव (2) गौरव रामभाऊ राऊत वय 21 वर्षे रा. कळंब (3) अभिषेक बबन म्हात्रे वय 24 वर्षे रा. शिंदी बु. ता. अचलपुर जि. अमरावती त्यांना अतिशय शिताफीने आरोपी लपून असलेल्या वेगवेळया ठिकाणावरुन्न एकाच वेळी ताब्यात घेण्यात आले. त्यापौकी एक आरोपी फरार असुन, ताब्यातील आरोपीतांची कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता जे तथ्य पोलीस पथकासमोर उजागर झाले ते ऐकून सर्व अवाक् झाले कारण या गुन्हयातील मुख्य सुत्रधार हा दुसरा तिसरा कोणीही नसून खुद्द मृतक हिचा पती नामे (4) अनिल रमेश कावळे हा असल्याचे न्निष्पण झाले, आरोपीतांना ताब्यात घेउन पुढिल कायदेशिर कार्यवाही करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही डॉ. दिलीप पाटील-भुजबल पोलीस अधीक्षक, यवतमाळ, डॉ. के. ए. धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा आदित्य मिलखेलकर यांचे नेतृत्वाखाली पथकातील प्रदिप परदेशी पोलीस निरीक्षक स्थागुशा, यवतमाळ व सोनाजी आमले, पोलीस निरीक्षक, दिग्रस सपोनि विजय रत्न्नपारखी पो.स्टे. दिग्रस, सपोनि विवेक देशमुख, स्थागुशा,  स.पो.नि अमोल पुरी, सायबर सेल, पोउपनि योगेश रंधे, सफौ यशवंत मोळोदे, पोहवा गजानन डोंगरे, पो.ना विशाल भगत,  कविश पाळेकर, कुणाल रुडे, पोकॉ अजय निंबोळकर मपोकॉ रोशनी जोगळेकर सर्व सायबर सेल यवतमाळ, पोहवा बंडु डांगे, पो.ना बबलु चव्हान, उल्हास कुरकुटे, निलेश राठोड, सुधिर पिदुरकर, सलमान्न शेख पोकॉ महमद भगतवाले, सलमान शेख, किशोर झेंडेकर, चालक प्रविन्न कुथे व निखील मडसे सर्व पोलीस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ यांन्नी पार पाडली आहे.

सदरच्या क्लिष्ठ, गुंतागुतीचा व आव्हानात्मक गुन्हयाच्या तापासात 72 तासामध्ये 04 आरोपी हे निष्पण करुन्न गुन्हा उघडकिस आणून्न प्रशंसनीय कामगिरीबाबत पोलीस पथकास डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी अधीकारी व पोलीस अंमलदार यांना रुपये 25 हजार रोख व GST व C-Note असे प्रोत्साहनपर बक्षिस जाहिर केले आहे.

दिनेश दमाहे

9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

वन शहीद स्वाती ताई ढूमने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांना श्रध्दांजली

Sun Nov 21 , 2021
चंद्रपुर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे शासकीय कर्तव्यावर असताना कु. स्वाती ताई ढूमने व वनमजुर यांचेवर माया नामक वाघिनिने अचानक हल्ला केला त्यात दुर्दैवाने स्वाती ताई ढूमने यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वणपाल संघटना नागपूर यांचे वतीने वन शहीद स्वर्गवासी स्वाती ताई ढूमने यांना आज दिनांक 21/11/ 21 रोजी जपानी गार्डन सेमिनरी हिल्स, नागपूर येथे श्रध्दांजली अर्पण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!