संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील रिद्धी सिद्धी कोलोनो च्या बाजूच्या शेतातून दोन अज्ञात इसमानी किर्लोस्कर कंपनीचा 15 हजार रुपये किमतीचा डिझेल पंप चोरून नेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी नरेंद्र पुरुषोत्तम कावलर वय 46 वर्ष रा पुरुषोत्तम नगर प्लॉट न 24 इंडियन ऑईल पेट्रोल पंप मागे रिद्धी सद्धी कॉलोनी रणाळा कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे आपले मावस भावाचे घरी गणपती चे जेवण करायला गेले होते व रात्री उशीरा घरी परत आले तेव्हा त्यांना त्यांचे शेता जवळ दोन इसम उभे दिसले फिर्यादी हे काही वेळा ने परत शेता जवळ येऊन पाहिले असता सदर दोन इसम दिसून आले नाही व किर्लोस्कर कंपनीचा डिझेल पंप की अ 15000/रु हा दिसून आला नाही अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट अज्ञात आरोपी विरुध्द वरून नमूद कलमांन्वये नमूद गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे