अवैध रेती वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात 42 चेक पोस्ट उभारणार : #जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर

नागपूर दि. १ : अवैध रेती वाहतुकीतून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील 42 संभाव्य ठिकाणी सीसीटीव्ही निगराणीचे 42 चेक पोस्ट उभारले जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज जिल्ह्यातील पोलिस, महसूल व गौण खनिज विभागाची बैठक घेऊन हे निर्देश दिले.जिल्ह्यातील नैसर्गिक जलसाठ्यांना तसेच गौण खनिजाला हाणी पोहोचविणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी महसूल ,पोलीस, गौण खनिज विभाग व गावागावातील सरपंचांनी देखील लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात सर्व विभागाचा परस्पर समन्वय ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी समर्पित कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्याबाबतही त्यांनी आज आदेश दिले.

या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा खनी कर्म अधिकारी श्रीराम कडू व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

चेक पोस्टवर कर्मचारी नियुक्त करणे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराची निगराणी ठेवणे, आवश्यकतेनुसार ड्रोन कॅमेराचा वापर करणे, तालुका व महत्त्वाच्या ठिकाणी गाव पातळीवर बैठकी घेणे, याबाबतचे निर्देश त्यांनी आजच्या बैठकीत दिले. पोलीस प्रशासनाने प्रत्येक ठाणेदाराला याबाबत अवगत करण्याचे ही त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चोर समजून दोन युवकांना गावकऱ्यांनी दिला चोप..

Fri Sep 2 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी खडकी बाम्हणी गावातील घटना.. गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील डूग्गीपार गावात काही दिवसापासून शेळ्या चोरीच्या घटना सुरु असल्याने दोन संशयित युवकांना चोर समजून गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सड़क अर्जुनी तालुक्यातील खडकी बाम्हणी गावात घडली आहे. अखेर डूग्गीपार पोलिसांना स्वाधिन केल्या नंतर गावकारी निघाल्याने पोलिसांनि त्यांना सोडले आहे. दरम्यान या मारहानीचा वीडियो प्रचंड वायरल होत आहे. खडकी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com