विद्यार्थ्यांनी तासिका ठरवून प्रत्येक विषयाला प्रामाणिकपणे न्याय द्यावा

स्पर्धा परिक्षार्थींना आईआरएस एन. बलराम यांचे मार्गदर्शन

मधुकरराव तामगाडगे प्रेरणा प्रबोधिनी वाचनालयातील विद्यार्थ्यांची घेतली सदिच्छा भेट

नागपूर – हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क या दोन गोष्टींचा मूलमंत्र अभ्यासात अंगिकारून अधिकारी होण्याचे ध्येय प्रत्येक विद्यार्थ्यांचे असायला हवे. केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), प्रशासकीय सेवा परिक्षा किंवा बॅंकेच्या स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासक्रमातील विशयांच्या दररोजच्या तासिका ठरवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. दररोजच्या अभ्यासात जर प्रत्येक विषयाला प्रामाणिक न्याय दिल्यास तुम्ही नक्कीच कुठलिही परिक्षा क्रॅक करू शकता, असा विश्वास सिंगरेनी कोलियरीज कंपनी लिमिटेडच्या (एससीसीएल) वित्त विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक एन. बलराम (आईआरएस) यांनी व्यक्त केला. भारत सरकारचे स्वामित्व असलेली कोळसा खाण कंपनी असेलेल्या एससीसीएलचे संचालक एन. बलराम यांनी नागपुर दौऱ्या दरम्यान ओमकार नगर येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटीमधील स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट मुख्यालयातील दुसऱ्या माळयावर असेलेल्या मधुकराव तामगाडगे प्रेरणा प्रबोधिनी वाचनालयात सदिच्छा भेेट दिली. याप्रसंगी स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे, सचिव निरगुसना ठमके, सल्लागार यषवंत बागडे यांची उपस्थिती होती.

तत्पूर्वी एन. बलराम यांचे ट्रस्टच्या उपाध्यक्षा लिना तामगाडगे यांनी शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुढे बोलतांना एन. बलराम म्हणाले की, मुलांनो परिक्षेत अपयश आल्यास नाउमेद होता कामा नये. अधिकारी होण्याचे ध्येय उराशी प्रत्येकांनी बाळगावे. तसेच अभ्यास करतानाच चालू घडामोडींबद्दल जागृत राहणे व त्यांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचेही एन. बलराम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगतिले. आई-वडीलांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्याकरिता स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे दरवर्षी शेकडो देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, स्पर्धा परिक्षार्थिंनीना अभ्यासिकेचे दालन, सिकलसेल आजाराबाबत निदानाबाबत जनजागृती तसेच इतर शैक्षणिक उपक्रमांबाबत माहिती लिना तामगाडगे यांनी एन. बलराम यांना दिली. याप्रसंगी ट्रस्टच्या समाजाभिमुख कार्याबाबत एन. बलराम प्रशंसा व्यक्त करून ट्रस्टचे कार्य हे इतर राज्यापर्यंत पोहचविण्याकरिता सिंगरेनी कोलीरीज कंपनी लिमिटेडतर्फे मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक अमोल कांबळे, नागेश पत्राळे, नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑरगानायजेशनचे (नास्को) संकल्प खोब्रागडे, प्रशांत सहारे, प्राची भगत, पंकज वंजारी, वैभव शंभरकर, स्लेशा वासनिक, सागर सरकटे, राजन शामुकवरसह स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रक्तदान ही व्यापक चळवळ बनली पाहिजे-एडिशनल सी पी नविनचंद्र रेड्डी.

Fri Aug 19 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – 257 रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान कामठी ता प्र 19 :- रक्तदान हे दानात दान असलेले सर्वश्रेष्ठ दान आहे .वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णांना रक्ताची कमी पडत असल्याने रक्तदान ही व्यापक चळवळ बनली असल्याचे मौलिक प्रतिपादन नागपूर शहर पोलीस विभागाचे एडिशनल सी पी नविनचंद्र रेड्डी यांनी व्यक्त केले. हज़रत बाबा अब्दुल्ला शाह नौशाही क़ादरी र अ 149 सालाना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!