संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
‘तिरंगा मार्च’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
कामठी ता प्र 14 : विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त आज रविवार 14 ऑगस्ट ला सकाळी 9 वाजता ‘तिरंगा मार्च’चे शुभारंभ ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथुन करण्यात आले.विशेष म्हणजे ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या मातोश्री नलिनीताई कुंभारे यांनी या तिरंगा मार्च ला तिरंगा झेंडा दाखवून या तिरंगा मार्च चे शुभारंभ केले.या तिरंगा मार्च चे नेतृत्व ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी केले. तपश्चात ड्रॅगन पॅलेस टेम्पल या ठिकाणी विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली व स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या प्रति आदरांजली सुद्धा वाहण्यात आली.
75 मिटर लांब तिरंगा झेंडा दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र येथे महिलांकडून तयार करण्यात आला होता.या तिरंगा झेंड्याच्या दोन्ही बाजूनी विद्यार्थी, सामाजिक संघटना, ओगावा सोसायटीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शैक्षणिक संघटनेने तिरंगा झेंडा आपल्या हातात घेऊन या मार्चमध्ये सहभागी झाले.ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथुन हा तिरंगा मार्च निघून मुख्य मार्गानी भ्रमण करीत ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे पोहोचून या तिरंगा मार्च चे समारोप झाले.समारोप प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व युवक युवतींनी एकच जल्लोष केला.परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर राष्ट्रगीताने या तिरंगा मार्च चे समारोप करण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अजय कदम,रेखा भावे, वंदना भगत,राजेश शंभरकर, सुनील वानखेडे,सुशील तायडे, सचिन नेवारे,महेंद्र मेंढे, चंदू कापसे,भीमराव आळे, नरेश बावनकुळे,अश्फाक कुरेशी, सेंगर सर, विनोद जुंमडे, देवेंद्र जगताप, विजय अलोने,अजमत अन्सारी, दिलीप बोबडे, प्रफुल वासे, ड्रॅगन पॅलेस इंटरनॅशनल स्कुल च्या प्रिंसिपल अमरीन फातिमा, मेघा स्वामी, शालीकराम अडकणे,प्रवीण चहांदे,शामली बागडे,विशाखा पाटील, निशा फुले,वैशाली अढाऊ, निशा कापसे,संध्या मानकर यांनी अथक परिश्रम घेतले.,