अमरदिप बडगे , प्रतिनिधी
एकाला वाचविण्यात यश तर दोघांचा बचाव पथकाकडून शोध सुरू
गोंदिया – जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर गोंदिया ताक्यातील तुमखेडा खुर्द येथील तीन युवक लोधीटोला येथील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेले असता, त्यांचा तोल गेल्याने तीन युवक नाल्याला आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेले.
तीन युवकांपैकी एका युवकाला वाचविण्यात यश आले असून दोघांचा शोध सुरू आहे. पूरात वाहून गेलेल्या युवकांचे नाव आशिष बागळे 24 वर्ष व संजू बागळे 27 वर्ष असे आहेत हे दोघेही भाऊ आहेत. सागर परतेगी 28 वर्ष याला वाचविण्यात आले आहे.