संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 13:- कायदा हातात घेऊन शहरात कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नसून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवता शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान पोलीस उपायुक्त लोहित मथानी यांनी कामठी पोलिसांच्यावतीने शहरात आयोजित पायदळ रूट मार्चच्या प्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केले रविवारला कामठी शहरातील एका तरुण-तरुणींनी धर्मगुरू बद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने तरुण ,तरुणीला अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी दोन्ही जुने व नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या घेराव करून तणावाची स्थिती निर्माण केली होती त्या दरम्यान नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग पूर्ण बंद पडला होता या मार्गाने जाणाऱ्या काही वाहनावर नागरिकांनी दगडफेक सुद्धा केली होती पोलीस उपायुक्त अमितेश कुमार व सर्व उपआयुक्त मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी, कर्मचारी दोन्ही ठाण्याच्या सभोवताल तळ ठोकून होते त्यांनी नागरिकांची समजूत घातल्याने मध्यरात्री एक वाजता सुमारास तणाव कमी झाला होता दुसऱ्या दिवशी शहरात कायदा सुव्यवस्था योग्यरीत्या राहावी याकरिता पोलिस प्रशासनाच्या वतीने नवीन कामठी पोलिस ठाण्यातून पैदल रूट मार्च ला सुरुवात करण्यात आली पैदल रूट मार्च इस्माईल पुरा , बुंनकरकॉलनी, जय भीम चौक, कामगार नगर, लकडगंज, गवळीपुरा, जयस्तंभ चौक, हरदास नगर ,हैद्री चौक ,मोडा ,मोदी पडाव, राम मंदिर ,कादर झेंडा ,खलाशी लाईन, संजय नगर ,भाजी मंडी, बोरकर चौक ,कोळसा टाळ ,रब्बानी चौक, इमलिबाग, वारीस पुरा ,फुटाणा ओली, पेरूमल चौक ,शुक्रवारी बाजार ,गोयल टाकीज चौक, गांधी चौक ,मेन रोड नगर भ्रमण करीत जुनी कामठी पोलीस स्टेशन मध्ये पैदल रूट मार्च चे समापन करण्यात आले पैदल रूट मार्च मध्ये पोलीस उपायुक्त रोहित मतानी, चिन्मय पंडित, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन अलुरकर, नवीन कामठी ठाणेदार संतोष वैरागडे जुनी कामठी ठाणेदार राहुल शिंरे दुय्यम निरीक्षक एस गड्डीखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एन घुगे, एन भातकुले, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे ,गीता रासकर ,अखिलेश ठाकूर, शैलेश यादव ,सुचित गजभिये ,अंकित ठाकूर सह शहर राज्य राखीव पोलीस दलाची ,तुकडी अतिशीघ्र पोलीस कृती दल, पोलिस कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पैदल रूट मार्च दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थितीची माहिती घेऊन शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले