खते-बियाण्यांच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

कृषी विभागाकडून नि:शुल्क क्रमांक जाहीर 

            नागपूर :  खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी खते, किटकनाशके व बी बियाणे खरेदी करताना, त्याच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत येणा-या अडचणी किंवा तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, येथे शेतक-यांना नि:शुल्क क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तक्रारी देता येणार आहेत, असे कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

शेतक-यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाच्या 18002334000 आणि 9373821174 या नि:शुल्क क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या jdanagpur@gmail.com  या इमेलवर शेतकऱ्यांच्या निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी आणि लिंकींगबाबत येणाऱ्या अडचणींची तक्रार शेतकऱ्याने त्याचे नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक व तक्रारीचा संक्ष‍िप्त तपशीलासह नोंदवावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कैद्याबाबत लेखी निवेदन 25 जून पर्यंत सादर करावे

Thu Jun 9 , 2022
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील 3 कैद्यांचा मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे झालेला असून मृत्युबाबतची दंडाधिकारीय चौकशी उपविभागीय दंडाधिकारी नागपूर शहर यांचे मार्फत करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत. घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छुकांनी सर्व माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसील कार्यालय, नागपूर शहर येथील खोली क्र. 1 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!