कन्हान : – वेकोलि गोंडेगाव प्रोजेक्ट येथे आलेले नविन उपक्षेत्र प्रबंधक राजेंद्र ठाकरे सर यांचे युथ कॉग्रेस पारशिवनी तालुका महासचिव शाहील गजभिये व युथ कॉग्रेस कार्यकर्त्या व्दारे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले.
वेकोलि गोंडेगाव प्रोजेक्ट गोंडेगाव उपक्षेत्रिय प्रबंधक तरूणकुमार त्रिवेदी यांच्या सेवानिवृत्ती नंतर वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्रिय प्रबंधक पद्दी राजेंद्र ठाकरे यांची नियक्ती झाल्याने सोमवार (दि.६) जुन ला युथ कॉग्रेस पारशिवनी तालुका महासचिव शाहील फुलचंद गजभिये यांच्या नेतुत्वात उपक्षेत्रिय प्रबंधक राजेंद्र ठाकरे हयांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच वेकोलि गोंडेगाव खुली खदान च्या विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी युथ कॉग्रेस चे कुणाल नाईक, विक्की दळणे, निलेश रंगारी, सुमित गजभिये, कुश नाईक, परमेश्वर चव्हाण, गौरव गजभिये, अनिल सहारे, प्रफुल रंगारी, आशिष कोडवते, आशिष नागदेवे, रितिक गजभिये सह कार्यकर्ते उपस्थित होते.