संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येथील समाजकार्य महाविद्यालयात सामाजिक न्याय विभागाचा नव्वदावा वर्धापन दिन व डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मनीष मुडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. सविता चिवंडे मंचावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ सविता चिवंडे यांनी प्रास्ताविक भाषणातून समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. या प्रसंगी डॉ.मनीष मुडे, प्रा. उज्ज्वला सुखदेवे, डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व संचालन डॉ. सविता चिवंडे यांनी केले. याप्रसंगी डॉ. प्रणाली पाटील, डॉ.हर्षल गजभिये, प्रा. राम बुटके, प्रा. अवेशखरणी शेख प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकेतर कर्मचारी वसंता तांबडे, राहुल पाटील, विद्यार्थी दिव्या गुजरकर, पल्लवी खंडाळे, साधना ढोक, ज्योती रिठोरे, स्नेहा घोडे, विद्या गडसांबार, अंकित पाली, हर्षिता नितनवरे, पिंकी चवरे, जितेंद्र ब्रह्मे, काजल बोरकर यांनी अथक परिश्रम घेतले.