जाहीर प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्याच्या अंतिम मुदतीत 9 आक्षेप दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-कामठी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर

कामठी :- पंचवार्षिक मुदत संपत असलेल्या कामठी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतिचे प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.यासंदर्भात तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या आदेशान्वये पंचवार्षिक मुदत संपत असलेल्या कामठी तालुक्यातील वारेगाव, चिखली, नान्हा मांगली,गारला,नेरी,उमरी,बिडगाव,वरंभा, बाबूलखेडा, चिकना,कवठा या 11 ग्रामपंचायतीत 21 जून रोजी विशेष ग्रामसभा घेऊन प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित ग्रामपंचायतीच्या प्रभागाचे अनुसूचित जाती महिला,अनुसूचित जमाती महिला,नामाप्र,नामाप्र महिला,व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सदर सोडती नंतर संबंधित ग्रामपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली.या प्रारूप प्रभाग रचनेवर 3 जुलै पर्यंत आक्षेप दाखल करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती.दरम्यान 3 जुलै पर्यंत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी होता त्यानुसार आजपावेतो 9 आक्षेपकर्त्यांनी आक्षेप नोंदविले.ज्यामध्ये वारेगाव ग्रामपंचायत चे सहा,नान्हा,चिखली व उमरी ग्रा प चे प्रत्येकी 1 चा समावेश आहे.

यानुसार वारेगाव ग्रा प च्या सहा आक्षेपकर्त्यांमध्ये अनिल जोगी,प्रदीप गोंडाळे, चंद्रभान दुधके,अंबादास पाटील,राजहंस मारबते,शंकर गोंडाळे चा समावेश आहे तर इतर तीन आक्षेपकर्त्यात उमरी चे अतुल गजभिये,नान्हा चे छत्रपाल करडभाजने व चिखली च्या विलास भोयर चा समावेश आहे.

या आक्षेपवर 7 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी हे प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देतील.12 जुलै रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता तर 14 जुलै ला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिंदे की रोटी जल गई,नया चूल्हा नया तवा : सामना

Mon Jul 3 , 2023
नागपुर/ मुम्बई/पटना :- शिवसेना UBT के मुख्यपत्र सामना में शिंदे सरकार पर तंज कसा गया है। सामना में लिखा कि शिंदे की रोटी जल गई और नया चूल्हा व नया तवा भी मिल गया है। बहुत जल्द ही शिंदे सहित बागी विधायकों को सत्ता से मरहूम कर दिया जाएगा। शिंदे की जगह अजित पवार को शिंदे की जगह बिठाया जाएगा। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com