आचारसंहिता भंगाच्या ८,६६८ तक्रारी निकाली; ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

Mon Nov 18 , 2024
▪️सूमारे 39 कोटी 60 लाखाचे साहित्य जप्त ▪️दिव्यांगांसाठी सुविधा ▪️प्रत्येक मतदान केंद्र निगराणीखाली नागपूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अवघे काही तास उरले असून मतदानासाठी निवडणूक विभाग योग्य त्या सर्व सुरक्षा यंत्रणांसह सज्ज झाली आहे. प्रत्येक मतदाराला निर्भय वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक मतदान व्हावे यासाठी नागपुरकरांसह जिल्ह्यातील मतदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com