86 मालमत्ता जप्त, 44 नळ कनेक्शन कपात थकबाकीदारांवर मनपाची कारवाई  

चंद्रपूर :-मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर मनपा वसुली पथकांची कारवाई सुरु असुन 86 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत,त्याचप्रमाणे 44 नळ कनेक्शन धारकांवर कपातीची कारवाई करण्यात आली आहे.

जप्त मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया करून थकीत रक्कम वसुलीची कारवाई करण्याकरीता झोननिहाय ३ पथके गठीत करण्यात आली असुन थकबाकीचा भरणा न केल्यास जप्ती केलेल्या मालमत्तांवर 15 दिवसांच्या आत कारवाई करण्याचा अधिकार मनपाला असल्यांने पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे .

यापुढेही अशीच धडक कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात येत असुन सवलत देऊनही मालमत्ता कर न भरण्याकडेच नागरिकांचा कल दिसत असल्याने सक्त पाऊले मनपाला उचलावी लागत आहे.

15 फेब्रुवारी पर्यंत केवळ 8734 मालमत्ता धारकांनी 50 टक्के शास्तीत सवलतीचा लाभ घेतला होता. 15 फेब्रुवारी नंतर ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट मनपातर्फे देण्यात येत आहे. करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे 15 पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान 10 मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. 

ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणार्‍या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गोवा व मध्य प्रदेशातील मद्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Mon Feb 24 , 2025
Ø 6 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त Ø गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक यवतमाळ :- राळेगाव येथे गोवा व मध्य प्रदेश या राज्यातून विक्रीसाठी आलेल्या मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. यात 1 हजार 632 लिटर विदेशी दारूसाठा जप्त करून संबंधित दोन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!