– समाज कल्याण विभागाचे पुढाकार
कन्हान :- नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान पिपरी नगर परिषद येथील पंचशील नगर सत्रापुर व एमजी नगर येथे एम.जी.एस संविधानिक हक्क संघटनेचे सचिव अर्जुन पात्रे आणि समाज कल्याण विभागाचे पुढाकाराने मांग गारुडीच्या वस्त्यांमध्ये शिबिर लावण्यात आले व शिबिरात मांग – गारुडी समाजाच्या 86 कुटुंबाना स्वतःचे घर मिळणार आहे असे प्रस्ताव समाज कल्याण विभागा द्वारे स्वीकृती देण्यात आली.
एम जी एस संविधानिक हक्क संघटनेचे सचिव अर्जुन पात्रे यांच्या प्रयत्नाने समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा सभा सत्रापुर वस्तीत घेण्यात आली . यावेळी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग डॉ.सिद्धार्थ गायकवाड व सहा.आयुक्त सुकेशिनी तेलगोटे प्रामुख्याने उपस्थित होते . सर्व प्रथम मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले . रमाई आवास योजना च्या अंतर्गत कन्हान – पिपरी नगर परिषद येथे जमा करण्यात आलेल्या 86 प्रस्ताव समाज कल्याण विभागा द्वारे स्वीकृती देण्यात आली . तसेच मांग गारोडी समाजाच्या प्रत्येक कुटुंबियांना पक्के घर मिळेल असे अधिकाऱ्यांनी आश्वस्त केले . ज्यांच्या कड़ें प्लाट नाही त्यांना आर्थिक मदत सुद्धा केले जाईल व मांग गारोडी समाजाच्या विविध समस्या सोडवण्याची हमी देण्यात आली .
या प्रसंगी खुशाल ढाक, संस्थेचे अध्यक्ष गणेश भालेकर , एम जी एस नवनिर्माण सेने चे अध्यक्ष मंगल लोंढे , संविधनिक हक्क संघटनचे उपाध्यक्ष समशेर पुरवले , रामेश्वर शेंडे , राजन भिसे , देविदास खडसे , रमु खडसे , शोभा शेंडे , रुपेश लोंढे , प्रीतम शेंडे , महेंद्र पात्रे , देवानंद पेटारे , आसन पात्रे , अनिल लोंढे , मुरली पात्रे , नितेश पात्रे , कुसना पात्रे ,जैन इंचुरकर ,महेश लोंढे , अरुण खडसे , गगन पात्रे , जुगणू पात्रे , विरेन गायकवाड , पदम पात्रे , संदीप शिंदे , सागर शेंडे , जितेंद्र पात्रे , गोपीचंद पात्रे , राम पात्रे , किरण शेंडे , लक्ष्मण पात्रे , अर्जुन गायकवाड , धिरेन खडसे , दुधणाथ , बंडू लोंढे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
” मांग गारोडी समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गात मोडतो. मात्र,यांच्याकडे कागदपत्रांची कमतरता असल्याने व अशिक्षितपणामुळे सरकारी योजनांचा लाभ त्यांना मिळत नव्हता. सामाजिक न्याय विभागांतर्गत रमाई घरकुल योजना मंजूर केली जाते. विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड व सहा.आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी घरकुलासंदर्भात पुढाकार घेतला.मांग गारुडीच्या वस्त्यांमध्ये शिबिर लावले,