सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 85 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शक्रवार (28) रोजी शोध पथकाने 85 प्रकरणांची नोंद करून 45000 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विसर्जन करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 28 प्रकरणांची नोंद करून 11200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 700 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून रु 2800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लाजिंग बोर्डीगचे हॉटेल,सिनेमाहॉल मंगल कार्यालय असा सस्थांनी रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु 6000 दंड वसूल करण्यात आलेला आहे.वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 12000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 29 प्रकरणांची नोंद करून रु 5800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून रु 6000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

REPORT ON 'ROARING FOR CONSERVATION: INTERNATIONAL TIGER DAY'

Sat Jul 29 , 2023
Nagpur :- The tiger is a symbol of beauty, strength, and nationality so save the tiger and save our nation’s pride.” International Tiger Day is an annual celebration to raise awareness about tiger conservation and instill a sense of responsibility towards protecting these majestic creatures. It is observed on 29th July each year. To promote this cause, the little toddlers […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com