सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 84 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवारी (ता. 16) रोजी उपद्रव शोध पथकाने 84 प्रकरणांची नोंद करून 35 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 28 प्रकरणांची नोंद करून 11 हजार 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 32 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 03 प्रकरणांची नोंद करून 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करुन 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 03 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरुवारी (ता. 16) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धरमपेठ झोन अंतर्गत मेन्स क्लोथ मेन रोड सिताबर्डी, धंतोली झोन अंतर्गत सतीश ट्रेडिंग कंपनी कॉटन मार्केट व गांधीबाग झोन अंतर्गत राधीका स्वीट्स भाजीमंडी ईतावरी या तीन प्रतिष्ठानांकडुन एकुण 15 हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत एलायंस अकेडमी ऑफ साईंस वर्मा लेआऊट अंबाझरी व आशीनगर झोन अंतर्गत सनफ्लॉवर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 05 प्रकरणाची नोंद करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

त्रिनिदाद येथे क्रिकेट अकादमी स्थापन करणार असल्याची माहिती

Fri May 17 , 2024
– त्रिनिदाद – टोबॅगो पंतप्रधानांचे राज्यपालांकडून स्वागत मुंबई :- भारतभेटीवर आलेले त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ ख्रिस्टोफर राऊली व त्यांच्या पत्नी शेरॉन राऊली यांचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज (गुरु. १६) राजभवन मुंबई येथे औपचारिक स्वागत केले. राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस या देखील यावेळी उपस्थित होत्या. त्रिनिदाद टोबॅगोने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेतली असे सांगून भारतीय उद्योजकांनी त्रिनिदाद टोबॅगोच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!