सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 77 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (23) रोजी शोध पथकाने 77 प्रकरणांची नोंद करून 32,300/- रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 9,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 5,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे,प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 26 प्रकरणांची नोंद करून 5,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 8,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने हनुमान नगर झोन अंतर्गत रूपेश जट्टेवार यांनी बांधकामाचे साहित्य अस्वच्छ केल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. होटल अशोका विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.गांधीबाग झोन अंतर्गत मे. राशी डीस्पोजल यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे ऑरेंज सीटी फेर(श्री मयुर मखेजा) विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच मे ऑरेंज सीटी फेर (श्री ईश्वर कस्तुरी ) विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे.गुरुकृपा स्वीटस यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्व शाळा महाविद्यालयात सीसीटीव्ही आवश्यक - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे निर्देश

Sat Aug 24 , 2024
– जिल्हा परिषद कामांचा आढावा – शासकीय रूग्णालयात स्वच्छता ठेवा – पोषण आहाराची नियमित तपासणी व्हावी गडचिरोली :- बदलापूरसारखी दुदैवी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नये यासाठी दक्षता घेणे आवश्यक असून जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा आणि महाविद्यालयात शासन नियमानुसार तातडीने सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद कामकाजाचा आढावा नियोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com