सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 75 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (24) रोजी शोध पथकाने 75 प्रकरणांची नोंद करून 47700 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 500 रुपयांचा दंड वसुल केला.हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 6400 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 1500 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 2400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल,सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आला. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु 13500 दंड वसूल करण्यात आला.या व्यतिरिक्त इतर 17 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 3400 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 6 प्रकरणांमध्ये 6000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह व या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 10000 दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे संदीप सरदार, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे धनराज कावळे, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

“क्षयरोग विरोधी लढा - एक कुरक्षेत्र यात नि-क्षय मित्र ही एक संजीवनी”

Sat Mar 25 , 2023
नागपूर :-  महानगरपालिका नागपूर यांचे राम जोशी, अतिरिक्त आयुक्त यांच्या आवाहनाला प्रगल्भ स्वयंसेवी संस्था यांनी प्रतिसाद देवुन 11 क्षयरूग्णांना दत्तक घेवुन एक संजिवनी देण्याचे कार्य केले. यात 11 क्षयरूग्णांपैकी एका क्षयरूग्णाने प्रगल्भ स्वयंसेवी संस्थेचे आभार मानुन मनोगत व्यक्त केले व ती या त्रासातुन तिला पोषण आहार औषधोपचारा दरम्यान किती मदतीचा ठरला याबद्यल तिने स्वतःचे मनोगत बोलुन व लिहुन विभागास कळविले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com