सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 75 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (07) रोजी शोध पथकाने 75 प्रकरणांची नोंद करून 47800 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 9200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 12000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 18000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. कैफे द ओला यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. हैलो वर्ल्ड प्रि स्कुल यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. नेहरु नगर अंतर्गत अब्दुल नजिम यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. रुपशे किराणा स्टोर यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. कुडेजा क्लॉथ व मे. पराथे किराणा शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. हयात मेडीकॉस यांच्या विरुध्द वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यात टाकल्याबद्दल रु. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सोयाबीन, कापूस व मूग पिकांवरील किड व रोगांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने सूचविल्या उपाययोजना  

Thu Aug 8 , 2024
नागपूर :- विदर्भात पाऊस, ढगाळ वातावरण जास्त आर्दता व कमी तापमानामुळे सोयाबीन, कापूस व मूग पिकावर किड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता यास नियंत्रित करण्याकरिता शेतकऱ्यांना कृषी सहसंचालक कार्यालयाने नियमित सर्वेक्षण, व्यवस्थापन आदी उपाययोजना सूचविल्या आहेत. कापूस पिकावर मावा, तूडतूडे आणि फुलकिडे या रसशोषक किडींचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून प्रादुर्भाव आढळुन येतो. तसेच बोंडअळी, डोंबकळ्यास्वरुपात दिसून येतो. किडींचे व्यवस्थापन योग्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com