प्रवासी श्रेणीत रेल्वेच्या महसुलात 73% वाढ

रेल्वेने आरक्षित प्रवासी श्रेणीत 48% आणि अनारक्षित प्रवासी श्रेणीत 361% वाढ नोंदवली

नवी दिल्‍ली :-एप्रिल 2022 ते जानेवारी 2023  दरम्यान भारतीय रेल्वेने प्रवासी श्रेणीमध्ये 54733  कोटी रुपये इतका  एकूण अंदाजे महसूल मिळवला , गेल्या वर्षी याच कालावधीतील 31634 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत  73 टक्के  वाढ झाली आहे.

आरक्षित प्रवासी श्रेणीत , 1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत रेल्वेचे आरक्षण केलेल्या प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या 6590 लाख असून गेल्या  वर्षीच्या  याच कालावधीतील 6181 लाखांच्या तुलनेत त्यात 7% वाढ झाली आहे.  1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत आरक्षित प्रवासी श्रेणीतून प्राप्त महसूल 42945 कोटी रुपये आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 29079 कोटी रुपये होता, आणि यात 48% ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अनारक्षित प्रवासी श्रेणीत , 1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत रेल्वेचे आरक्षण केलेल्या प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या 45180  लाख असून गेल्या  वर्षीच्या  याच कालावधीतील 19785 लाखांच्या तुलनेत त्यात 128% वाढ झाली आहे.  1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीतला  अनारक्षित प्रवासी श्रेणीतून प्राप्त महसूल 11788  कोटी रुपये आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 2555 कोटी रुपये होता, आणि यात 361% ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.,

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Fri Feb 3 , 2023
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.2) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com