सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 70 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता. 12) रोजी उपद्रव शोध पथकाने 70 प्रकरणांची नोंद करून 40 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला आहे.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करुन 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंग, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 04 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 07 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अश्या ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 03 प्रकरणाची नोंद करुन 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करुन 03 हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम या अंतर्गत 02 प्रकरणाची नोंद करुन 2 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 03 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. संपूर्ण कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगणाऱ्याकडून रु. 10 हजारांचा दंड वसूल*

उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी(ता.12) प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगणे 2 प्रकरणाची नोंद करून प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगणाऱ्याकडून 10 हजारांचा दंड वसूल केला, यात गांधीबाग झोन अंतर्गत इतवारी मासुरकर रोड येथील मे. अल-बक्ष- हॉटेल यांच्याकडून प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगणे या प्रकरणी कारवाई करून रु.5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच परवानगी शिवाय विद्युत खांबांवर जाहिरात फलक लावण्याप्रकरणी सी.ए. रोड, छापरू नगर येथील मे. करिअर पॉईंट यांच्यावर कारवाई करीत 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत शनी नगर, मारवाडी वाडी येथील शिव शक्तीय आयस्क्रीवम यांच्यावर प्रतिबंधात्म‍क प्लास्टिक बाळगणे या प्रकरणी कारवाई करीत 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.असे एकूण 4 प्रकरणांची नोंद करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चोरीचे गुन्हयातील पाहीजे आरोपीस शस्त्रासह अटक

Thu Jun 13 , 2024
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ ये अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून सापळा रचून जुना बगडगंज चौक जवळ, क्लासीक मोबाईल शॉपीसमोर मिळालेल्या वर्णनाच्या स्लेंडर मोटारसायकल क. एम. एच. ४९ बि.एक्स. १२५१ वरील ईसमास ताब्यात घेतले. त्याचे गाडीचे सिटखाली एक लोखंडी तलवार किंमती अंदाजे १,०००/-रु. ची मिळून आली. आरोपीची सखोल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com