सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 69 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवारी (15) रोजी शोध पथकाने 69 प्रकरणांची नोंद करून 39800 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकानी हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 10,000 रुपयांची वसुली करण्यात आली.वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 13500 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून रु 3600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून रु 7000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिनाथ गर्ल्स कॉलेज जवळ अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

Tue May 16 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील आदिनाथ गर्ल्स कॉलेज जवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना काल रात्री साडे आठ दरम्यान उघडकीस आली असून मृतकाची ओळख अजूनही पटलेली नाही मात्र या मृत्यू प्रकरणात मृतकाशी घातपात झाला असावा वा मृतकाने आत्महत्या केली असावी असा तर्क लावण्यात येत आहे त्यामुळे या मृत्यू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com