सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 68 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (11) रोजी शोध पथकाने 68 प्रकरणांची नोंद करून 35200 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून 4400 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 800 दंड वसूल करण्यात आलेला आहे.

मॉल, उपहारगृहे, लाजिंग बोर्डीगचे हॉटेल,सिनेमाहॉल मंगल कार्यालय असा सस्थांनी रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 10,000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविले अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आला.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 24 प्रकरणांची नोंद करून रु 4800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून रु 9000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पक्ष सांभाळता आला नाही हा कलंक कसा पुसणार! खासदार कृपाल तुमाने यांचा उद्धव ठाकरेंवर निशाना

Wed Jul 12 , 2023
नागपूर :- शिवसेना पक्षाच्या विचारांशी तडजोड करून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत सत्ता स्थापन करण्याचा आणि पक्ष सांभाळू न शकण्याचा कंलक उद्धव ठाकरे यांच्या माथ्यावर लागला असून तो कसा पुसणार? असा प्रश्न रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी केला. भाजपाच्या नेत्यांना व नागपूरला कंलक असे विधान करून ठाकरे यांनी त्यांच्या विचारांची पातळी दाखविली आहे, अशी खरमरित टीकाही त्यांनी केली. देवेंद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!