– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (24) रोजी शोध पथकाने 67 प्रकरणांची नोंद करून रु.63,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 22 प्रकरणांची नोंद करून रु.9,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून रु.300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद करून रु.3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 08 प्रकरणांची नोंद करून रु.17,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्यांचा कचर रस्ता, फुटपाथ मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 31 प्रकरणांची नोंद करून रु.6,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून रु.13,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. गायत्री अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत मे. ओ. नो. होस्टेल यांनी वसतिगृहांमध्ये अन्नपदार्थ टाकून चेंबर लाईनमध्ये अडथळा आणणे आणि हरित न्यायाधिकरण कायद्या अंतर्गत रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. माय मोमो फाक्ट्री यांनी चेंबरमध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला व प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.
हनुमान नगर झोन अंतर्गत सरस्वती शीशू मंदीर ॲन्ड प्ले स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. नेहरू नगर झोन अंतर्गत मे. पाटील क्लासेस यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्या प्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला व मे. कीट्स मेंटोर ग्लोबल सकुल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. गांधी बाग झोन अंतर्गत मे. तकदीर आईस गोला यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला व मे. जैन स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. आशी नगर झोन अंतर्गत श्रीमती. सोनाली तांबे यांनी अंडरग्राउंड कनेक्शनसाठी पाईपलाईन बसवण्यासाठी खोदकाम केल्याने सर्व्हिस रॉडचे नुकसान केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. मलिक फॅशन ॲन्ड लाइफ स्टाईल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 11 प्रकरणांची नोंद करून रू. 70,000/- दंड वसूल केला.