सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 66 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (13) रोजी शोध पथकाने 53 प्रकरणांची नोंद करून 52,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 3,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 1200/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 25,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे,प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 8,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. द कबाब यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला व संजय तुकाराम यांनी हॉटेलचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. वेगास प्रिमियम यांनी हॉटेलचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. साई कस्टल 6 यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. मीना स्वीटस् भंडार यांच्या यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. सलाम अहम्मद यांनी दुकानातील कचरा अनधिकृत ठिकाणी टाकल्या बद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू. 40,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी मनपाची ४ फिजिओथेरपी केंद्र

Sat Sep 14 , 2024
– माफक दरात मिळणार सर्व सेवा नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ फिजिओथेरपी केंद्र लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या केंद्रामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवा माफक दारात उपलब्ध करण्यात येईल. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह ,सदर रोग निदान केंद्र आणि महाल रोग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com