सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 65प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (18) रोजी शोध पथकाने 65 प्रकरणांची नोंद करून 46700 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे.हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 5200 रुपयांची वसुली करण्यात आली.

कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून रु 520 दंड वसूल करण्यात आलेला आहे. मॉल, उपहारगृहे, लाजिंग बोर्डीगचे हॉटेल,सिनेमाहॉल मंगल कार्यालय असा सस्थांनी रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 18500 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून रु 3200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून रु 10,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज से टेकड़ी फ्लाईओवर को तोड़ने का काम होगा शुरू

Wed Jul 19 , 2023
*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड* (नागपुर मेट्रो रेल परियोजना) नागपुर :- बहुप्रतीक्षित टेकड़ी फ्लाईओवर को तोड़ने का काम आज १९ जुलाई २०२३ (बुधवार) से शुरू होगा। महा मेट्रो की ओर से इस संबंध में सभी तरह की तैयारियां कर ली गई हैं। गौरतलब है कि फ्लाईओवर के नीचे की दुकानें खाली कराकर शिफ्ट कर दी गई हैं।मनपा ने महा मेट्रो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com