महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

मुंबई – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या बासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी (दि. १) शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी राज्यपालांनी संचलनाचे निरीक्षण केले तसेच राज्यातील नागरिकांना मराठीतून संबोधित केले.   (राज्यपालांच्या भाषणाच्या मराठी, इंग्रजी व हिंदी प्रति जोडल्या आहेत)

या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबाल सिंह चहल, पोलीस आयुक्त संजय पांडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन व पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल; महाराष्ट्र पोलीस, बृहन्मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस बल व मुंबई अग्निशमन दल यांच्या निशाण टोळ्या, मुंबई लोकमार्ग पोलीस दल, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल,  बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा तसेच ब्रास बँड व पाईप बंद वाद्यवृंद पथकाने दिमाखदार संचलन केले.

संचलनात बृहन्मुंबई पोलीस विभागाची महिला निर्भया पथके व मुंबई अग्निशमन दलाची अत्याधुनिक वाहने देखील सहभागी झाली होती.

राज्यपालांचे संगीत कला अकादमीला २५ हजार रुपयांचे बक्षीस 

मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमाला उपस्थित राहून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ऐकला.

यावेळी महाराष्ट्र गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीला पंचेवीस हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.

यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख, माजी मंत्री दिवाकर रावते, आमदार सदानंद सरवणकर, आमदार सुनील शिंदे, आयुक्त इकबाल सिंह चहल, माजी महापौर महादेव देवळे, श्रद्धा जाधव, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार व इतर  उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबध्द -पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

Mon May 2 , 2022
 – विक्रमी सायकल परेडसाठी केले जिल्हावासियांचे कौतुक –  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार –  महाराष्ट्र दिनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम भंडारा : आज संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा 62 वा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. महाराष्ट्र हे सुरवातीपासूनच विविध क्षेत्रात अग्रणी असलेले राज्य आहे. गत दोन वर्षात कोरोनावर मात करत जिल्ह्याने विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!