सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 62 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (22) रोजी शोध पथकाने 62 प्रकरणांची नोंद करून 29000 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी उघडयावर अस्वच्छता करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4000 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 900 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून रु 3600 दंड वसूल करण्यात आलेला आहे.मॉल, उपहारगृहे, लाजिंग बोर्डीगचे हॉटेल,सिनेमाहॉल मंगल कार्यालय असा सस्थांनी रस्ता मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 2000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तीक कामांकरीता बंद करणेबाबत एकूण 8 प्रकरणांची नोंद करून रु 6000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविले अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून रु 3000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून रु 8000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Indian Railways signed MoU with United States Agency for International Development/India (USAID/India)

Fri Jun 23 , 2023
MoU envisages co-operation with USAID/India on clean energy and energy efficiency solutions The effort is to reduce carbon footprint of Indian Railways in order to achieve Mission Net Zero Carbon Emission New Delhi :-Indian Railways (IR) is proactively working towards the achievement of Net Zero Carbon Emission by 2030. IR has strategized multipronged approach. https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 As part of its commitment […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com