सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 62 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई     

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. 16) रोजी उपद्रव शोध पथकाने 62 प्रकरणांची नोंद करून 44 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7 हजार 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 09 प्रकरणांची नोंद करून 14 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 15 प्रकरणांची नोंद करून 15 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

* प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 04 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता. 16) रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपूरा झोन अंतर्गत रोज केक सोनपापडी मेहंदीबाग रोड प्रेम नगर, गांधीबाग झोन अंतर्गत खुमारे किराणा गरोबा मैदान, हनुमान नगर झोन अंतर्गत महाराष्ट्र केट्रर्स संताजी सभाग्रह बुधवार बाजार आणि धंतोली झोन अंतर्गत सुरेश नयुरे कॉटन मार्केट या चार प्रतिष्ठानांकडुन एकुण 20 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत पंकज तेंदुलकर शिवाजी नगर कचरा रस्त्याच्या कडेला टाकणेबाबत यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत सुफा एजुकेशन हॅब अतकर ले-आऊट उमरेड रोड परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अब्दुल कादीर रींग रोड पावर हाऊस जवळ भंगार साहित्य रस्त्याच्या कडेला टाकणेबाबत यांच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 07 प्रकरणांची नोंद करून 35 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत भाग घेण्यास दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत मुदत वाढ

Wed Jul 17 , 2024
– सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन  गडचिरोली :- राज्यात खरीप 2014 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र शासनाच्या नियमानुसार राबविण्यात येते. खरीप 2024 मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर (www.pmfby.gov.in) थेट ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरू केली होती व भाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै 2024 होता. दिनांक 15 जुलै 2024 रोजी सकाळी 10 पर्यंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com