आचारसंहिता भंगाच्या ५,८६३ तक्रारी निकाली; ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ५ हजार ९०२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ५ हजार ८६३ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कपाशी पिकावरील स्पोडोप्टेरा लिटुरा अळी व्यवस्थापनाचा कृषी विभागाचा सल्ला

Thu Nov 14 , 2024
नागपूर :– कपाशी पिकावरील तंबाखुची पाने खाणाऱ्या अळीच्या (स्पोडोप्टेरा लिटुरा) प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून या अळीच्या व्यवस्थापन व उपाययोजनेचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आला आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-13-at-13.36.19_a6cf01ac.mp4 वर्तमान स्थितीमध्ये कपाशी पिकावर स्पोडोप्टेरा लिटुरा अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या किडीचा मादी पतंग कपाशी पानावर खालच्या बाजुने पुंजक्यात अंडी घालतो.एका अंडी पुंजक्यामध्ये 80 ते 100 अंडी असतात. या अंडयांमधून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com