57 फुट उंच बुध्द मूर्तीचे ससाईंच्या हस्ते अनावरण

– उपासक उपासिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

नागपूर :- चंद्रमणी बौद्ध विहार समितीच्या वतीने तथागत गौतम बुध्द यांच्या 57 फुट उंच मूर्तीचा अनावरण समारंभ रविवार 16 एप्रिलला चंद्रमणी बौध्द विहाराच्या प्रांगणात (पवनी) आयोजित करण्यात आला आहे. ही भव्य मूर्ती पुरातत्व विभागाच्या उत्खननात मिळालेल्या बौध्द स्तुपाजवळच (सम्राट अशोक कालीन बौध्द नगरी) बालसमुद्र किनारी आहे. त्यामुळे या मूर्तीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल तर विशेष अतिथी म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी खासदार प्रा. जागेंद्र कवाडे, माजी मंत्री बंडू सावरबांधे, माजी मंत्री विलास श्रुंगारपवार, आमदार नरेंद्र भोंडेकर, जि.प. अध्यक्ष (भंडारा) गंगाधर जिभकाटे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, लिडकॉमचे डायरेक्टर धम्मज्योती गजभिये, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड उपस्थित राहतील. महाबोधी भिक्खु संघाचे प्रतिनिधी भदंत महाबोधी, भिक्खुनी संघप्रिया तसेच बौध्द राष्ट्रातील भंते उपस्थित राहतील.

या कार्यक्रमाचे संयोजक शैलेश मयूर, विलास राऊत, महात्मा फुले महामंडळाचे व्यवस्थापक सिध्दार्थ खोब्रागडे, डॉ. बंडू मेश्राम, राजेश कांबळे, निलीमा रंगारी, डॉ. विवेक मेश्राम, नरेंद्र निस्वादे, मोहन पंचभाई, मोहन सुरकर, डी. एफ. कोचे, सच्चितानंद फुलेकर, महेंद्र गडकरी, नरेश डहारे, मारेश्वर गजभिये आणि अशित बागडे यांच्या उपस्थितीत आयोजित सोहळ्याला नागपूर तसेच विदर्भातील उपासक उपासिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NAGPUR’S 1’ST PET FASHION SHOW BY PAWCARE.IND.IN

Mon Apr 10 , 2023
Nagpur :- Owning a pet is a big responsibility, and it teaches children and adults alike about the importance of caring for another living being. Proper pet care instils a sense of responsibility and can help teach important life skills like patience, empathy, and compassion. To create awareness and provide 24X7 Vet care service, Pawcare.ind.in is organizing a Pet Fashion […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com