– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. 25) रोजी उपद्रव शोध पथकाने 57 प्रकरणांची नोंद करून 33 हजार 400 रुपयाचा दंड वसूल केला.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
मॉल, उपहारगृह, लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 14 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन 1 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 3 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 2 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 03 प्रकरणांची नोंद*
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता. 25) रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत धकाते किराणा स्टोर्स रानी दुर्गावती चौक, गांधीबाग झोन अंतर्गत शुभम स्वीट मार्ट गरोबा मैदान चौक आणि धरमपेठ झोन अंतर्गत रीना फुड भंडार नेताजी मार्केट सिताबर्डी या तीन प्रतिष्ठानांकडून एकुण 15 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत साई राजवाडा हिल रोड गांधी नगर आणि धंतोली झोन अंतर्गत काव्य नरेंद्र नगर रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या दोन प्रतिष्ठानांकडून एकुण 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत गोपाल ओमप्रकाश अग्रवाल गोकुलपेठ दुकानाचा कचरा रस्त्याचा कडेला टाकणेबाबत यांच्याकडून 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत ओयो हॉटेल गोसीया कॉलोनी मानेवाडा आणि मंगळवारी झोन अंतर्गत स्टाईलो फॅशन एक्झीबीशन गोंडवाना चौक परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास या दोन प्रतिष्ठानांकडून एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. आशी नगर झोन अंतर्गत इंन्द्राराज ठाकुर वैशाली नगर बांधकाम साहित्य डंप करुन जवळच्या नाल्याचे नुकसान करणे बाबत यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. नेहरु नगर झोन अंतर्गत जनाब अकबररुदी्न खान ताजबाग दिघोरी रोड रस्त्याच्या कडेला जवळच्या दुकानातील कचरा जाळणेबाबत 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 10 प्रकरणांची नोंद करून 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.