– कन्हान पोलीसाची कारवाई एकुण ४०६०० रूपया चा मुद्देमाल जप्त.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत हरिहर नगर कांद्री येथे राहते घरी अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखु विक्री करिता साठा करून ठेवलेले बागबान तंबाखुचे एकुण ५६ टिनाचे डब्बे एकुण चाळीस हजार सहाशे रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अखिलेश वाघमारे यास ताब्यात घेऊन त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीसानी यशस्विरित्या कारवाई पार पाडली.
कन्हान पोलीस स्टेशनचे पोउपनि. प्रविण हारगुडे सोबत पो.हवा. रोशन देवतडे, म.पो.हवा. प्रतिभा मरसकोल्हे, पो.शी. निखील मिश्रा यांचे सह खाजगी वाहनाने पो.स्टे. परिसरात पेट्रोलींग करिता गोपनीय माहिती प्राप्त झाली की, कांद्री हरिहर नगर येथील अखिलेश वाघमारे याने घरी अवैधरित्या प्रति बंधित सुगंधित तंबाखु विक्री करिता साठा करून ठेवला आहे. अशा खात्रीशिर माहिती वरून कार्यवाही करिता पोलीस स्टाप पंचासह मौजा कांद्री येथील हरिहर नगर येथे उत्तर मुखी असलेल्या घरा समोर जावून अखिलेश वाघमारे ला आवाज दिले असता एक ईसम घराबाहेर आला त्यास नाव, गाव विचारले तर त्याने अखिलेश विजय वाघमारे वय २४ वर्षे रा. वार्ड क्र १ हरिहर नगर, कांद्री, कन्हान ता. पारशिवनी जि. नागपुर असे सांगितल्याने त्यांचे राहते घराची ३.१५ वा. झडती घेतली असता त्याच्या घरा समोरील खोलीतील पुर्वे बाजुच्या कोपऱ्यात एक पांढऱ्या रंगाची प्लास्टीकची चुगंळी दिसल्याने सदर चूंगडी उघडुन पाहले तर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुंग धित तंबाखुजन्य पदार्थ बागबान तंबाखुचे एकूण ५६ टिनाचे डब्बे, एक डब्बा वजन ५०० ग्राम, किमंत ७२५ /- रू असे एकुण ५६ डब्बे किंमत ४०६००/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी अखिलेश विजय वाघमारे वय २४ वर्षे रा. वार्ड क्र १, हरिहर नगर, कांद्री, कन्हान ता. पारशिवनी जि. नागपुर हे राहते घरी स्वतः चे फायद्या साठी विक्री करिता साठवणुक केल्याने सरकार तर्फे फिर्यादी प्रविण हारगुडे पोउपनी. कन्हान त्याचे तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला आरोपी विरूध्द कलम २७२, २७३, ३२८, १८८ भादं वी. सहकलम २६(२) (ii), २६(२) (iv), २७(२) (इ), ३०(२) (अ) अन्न सुरक्षा आणि माणके अधिनियम २००६ अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.