एकल खिडकी सुविधेअंतर्गत ५१ मंडळांना परवानगी

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सवासाठी सुरु करण्यात आलेल्या एकल खिडकी सुविधेअंतर्गत एकुण ५१ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.

येत्या १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना असुन २३ ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार असुन उत्सव साजरा करण्याच्या परवानगीसाठी १६५ मंडळांचे अर्ज आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. सर्व विभागाकडुन ना हरकत मिळाल्यानंतरच ऑनलाईन परवानगी दिली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत आहेत. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडुन परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येत आहे.

सार्वजनिक मंडळांना शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियमावली बाबत हमीपत्र घेऊन परवानगी दिली जात आहे. उत्सव साजरा करतांना मनपाने दिलेली परवानगी मंडपाच्‍या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहणार असुन सार्वजनिक मंडळाकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच पीओपी मूर्ती ठेवणाऱ्या मंडळांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे.

एकल खिडकी योजना –

सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या cmcchandrapur.com या संकेतस्थळावर quick link सदरात pandal permission २०२३ येथे ही लिंक उपलब्ध आहे. अथवा https://pandal.cmcchandrapur.com/ येथे भेट देऊन ऑनलाईन अर्ज करणे शक्य आहे. यामध्ये पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विविध विभागांचे प्रतिनिधी संबंधित सादर केलेल्या अर्जांची छाननी करतील व महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Current festival season to generate 3 lakh crore business this year

Sun Oct 15 , 2023
Nagpur :- Having no fear from covid or any dreaded diseases this year, the consumers across the Country are fully geared up to celebrate current festival season with big fanfare and festivity spirit which is likely to bring a consumer spending of about Rs 3 lakh crore. Last year the sale of festive shopping was about Rs. 2.50 lakh crore. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com