नागपूर :- राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपुर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या ५० विदेशी पाहूण्यांनी गुरुवार, दि. २१-०९-२०२३ रोजी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी उद्यानातील सफारीचा पावसाच्या साक्षीने आनंद लुटला. जोरदार पावसाच्या वातावरणातही गोरेवाडा उद्यानातील प्राण्यांनी परदेशी पाहूण्यांना मनसोक्त दर्शन दिले.