मनपा पाणीकर वसुली पथकांद्वारे ५.२७ कोटींची वसुली, १२ पथके सतत कार्यरत १०४ थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित

चंद्रपूर – पाणीकराची करवसुली मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने मनपातर्फे करवसुली मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. पाणीपट्टी कर वसुलीसाठी मनपाद्वारे १२ पथके गठीत करण्यात आली असुन आर्थिक वर्ष २०२२-२३ करीता रू. १२.९७ कोटी थकीत मागणी व रू. ५.४५ कोटी चालू मागणी अशी एकूण रू. १८.४३ कोटी पाणीपट्टी कराची वसुली थकीत असुन यातील ५.२७ कोटींची वसुली मनपाच्या १२ पथकांद्वारे करण्यात आली आहे.

मनपाचे ५१ अधिकारी – कर्मचारी यांची पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत असुन थकबाकी वसुली तसेच थकबाकी न भरल्यास नळ जोडणी कपात करण्याची कारवाई केली जात आहे. आतापर्यंत वसुली पथकांद्वारे १०४ नळधारकांचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले असुन थकबाकीदारांवर सातत्याने कारवाई केली जात आहे.

नळधारकांनी थकीत कराचा भरणा प्रियदर्शिनी चौक पाणी टाकी येथील मनपाचे पाणी पुरवठा कार्यालय, झोन कार्यालय क्रमांक १- संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, झोन कार्यालय क्रमांक २- कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, झोन कार्यालय क्रमांक ३- देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प येथे करावा तसेच www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर सुद्धा पाणीपट्टी कराचा भरणा करता येणे शक्य आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोबाईल चोरास रंगेहात अटक

Tue Jan 31 , 2023
-शिवनाथ एक्सप्रेस मधील घटना नागपूर –शिवनाथ एक्सप्रेमधून मोबाईल चोरणार्‍या चार आरोपींच्या आरपीएफच्या पथकाने मुसक्या आवळल्या. चौकशी करून चौघांनाही इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. ही घटना इतवारी रेल्वे स्थानकावर घडली. 18239 शिवनाथ एक्सप्रेसला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. ही संधी साधून चारही आरोपी प्रवाशांचे मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने आले. प्रवाशांचे खिसे चाचपत असतानाच कर्तव्यावर असलेले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!