सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 49 प्रकरणांची नोंद

 – उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. 11) रोजी उपद्रव शोध पथकाने 49 प्रकरणांची नोंद करून 31 हजार रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करुन 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 4 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 100 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 1 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 02 प्रकरणांची नोंद करून 4 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 6 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करुन 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 03 प्रकरणांची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मंगळवारी (ता. 11) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर धंतोली झोन अंतर्गत प्रविण धानकर कॉटन मार्केट, गांधीबाग झोन अंतर्गत विदर्भ किराणा स्टोर्स शाहिद चौक ईतवारी व सतरंजीपुरा झोन अंतर्गत माहित स्वीट्स नारायणपेठ प्रेम नगर या तीन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 15 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत शाहु बिल्डर्स पडोले नगर वाठोडा, मंगळवारी झोन अंतर्गत असोसिएट्स आनंद चांडक आर्य नगर मानकापूर बांधकामाचा कचरा रस्त्‍यालगत टाकल्याबाबत या दोन प्रतिष्ठानांकडून एकूण 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत चैत्नय आयटीआय अमरावती रोड, आशीनगर झोन अंतर्गत द राईझिंग स्टार दिक्षीत नगर नारी रोड परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 7 प्रकरणांची नोंद करून 45 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

14 वर्षोय मुलाचा गळफासने मृत्यु

Wed Jun 12 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा रहिवासी 14 वर्षीय मुलाचा राहत्या घरात खेळता खेळता कपडे ठेवण्याच्या नॉयलॉन दोरीने गळफास लागल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी 10 .45 वाजता घडली असून मृतक मुलाचे नाव चिन्मय नेवारे वय 14 वर्षे रा मोंढा कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर 14 वर्षीय मृतक बालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!