सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 48 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (06) रोजी शोध पथकाने 28 प्रकरणांची नोंद करून 26,200/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 20,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 11 प्रकरणांची नोंद करून 2,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. गणेश मुर्ती भंडार व वीनोदराव शेंडे यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. राजु धुंभारे यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत श्री. यशवंत सातपुते यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. भुषण गणेश मुर्ती भंडार व मे. अष्टवीनायक मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत प्रवीन बनकर यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत अमोल डोंगरे, गजानन मुर्ती भंडार व मे. जैस्वाल मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 30,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. स्वाती मुर्ती भंडार,मे.नारायण आर्ट, मे.गणेश मुर्ती भंडार, श्री राम मुर्ती भंडार, पाणखुडी मुर्ती भंडार व जीतु मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 60,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. आरोही आर्ट व मे. शारदा मूर्ती आर्ट यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत मे. पवन भंडार यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. सचीन विनेगर यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 20 प्रकरणांची नोंद करून रू. 1,85,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिक्षक दिनी आदर्श शिक्षक,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Sun Sep 8 , 2024
चंद्रपूर :- योग्य शिक्षणातुन संस्कारी विद्यार्थी घडत असल्याने शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. कठीण गोष्टी सोपी करून सांगणारे शिक्षक असतात. मनपा शाळांना उत्तम शिक्षक मिळाले आहेत त्यांच्या सहकार्याने शाळांचा उंचावण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी राणी हिराई सभागृहात आयोजित शिक्षक दिन समारंभात केले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com