४ प्रकरणांना ऑन द स्पॉट मान्यता

– आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासोबत बैठक

नागपूर :- १९ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या सहविचार सभेचा आढावा घेण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या दालनात आमदार  सुधाकर अडबाले यांनी बैठक घेतली. बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान प्रलंबित प्रकरणे आजच निकाली काढा, अशी आमदार सुधाकर अडबाले यांनी तंबी दिली आणि जिल्ह्यातील ४ प्रकरणांना “ऑन द स्पॉट” मान्यता देण्यात आली.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात अनुकंपा तत्त्वाअंतर्गत पुष्पम कुंभरे (नंदनवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदनवन) यांना कनिष्ठ लिपिक सेवक, मंगला प्रवीण मंडपे (गौतम विद्यालय डोंगरगाव तालुका कुही) यांना मुख्याध्यापकपदी, तुलशीदास पटले यांना अर्धवट ग्रंथपाल पदावरून पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर उन्नयन तर रियाज हकीम कुरेशी यांना कालबद्ध पदोन्नती मान्यता देण्यात आल्या. यासह सभेतील इतरही प्रलंबित विषय तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी दिल्या. यावर शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी सर्व प्रकरणे लवकर निकाली काढण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रा.) अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बढे, विजय गोमकर, धनराज राऊत, लक्ष्मीकांत व्होरा, मंगेश घवघवे, सचिन इंगोले, बांबल सर, राजू मोहोड, दत्तराज उमाळे, गणेश चापले, शैलेश येडके, पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ नागरिकांना गुरुवारी मोफत लसीकरण

Wed Oct 9 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालीकेद्वारे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना टी बी संरक्षक लस गुरूवारी 10 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत उल्हासनगर बगीच्यात मोफत लसीकरण करण्यात येणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा ज्येष्ठ नागरिक कक्षाचे संयोजक व सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट चे सचिव सुरेश रेवतकर यांनी एका पत्रकात केले आहे. नागपूर महानगर पालिकेतील ईतर केन्द्रावर टीबी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com