– ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व विवेकानंद सेवा मंडळ चँरिटेबल ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने
कन्हान :- ग्रामोन्नती प्रतिष्ठाण नागपुर (महा.), शेतकरी कष्टकरी महासंघ विदर्भ आणि विवेकानंद सेवा मंडळ चँरिटेबल ट्रस्ट कन्हान च्या संयुक्त विद्यमाने ३९ जेष्ठ, वयोवृद्ध नागरींकांनी निःशुल्क आरोग्य तपासणी व औषधी वितरणाचा लाभ घेऊन शिबीर संपन्न केले.
ग्रामोन्नती प्रतिष्ठाण नागपुर (महा.), शेतकरी कष्टकरी महासंघ विदर्भ आणि विवेकानंद सेवा मंडळ चँरिटेबल ट्रस्ट कन्हान चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार प्रकाश जाधव यानी २६ जानेवारी २०२५ ला कार्यक्रमात परिसरातील जेष्ठ, वयोवृध्द नागरिकांचे निशुल्क आरोग्य तपासणी करण्याची घोषणा केली होती. त्या अनुसंगाने शुक्रवार (दि.२१) मार्च ला संस्थेच्या ” शिवरत्न ” जनसेवेच्या कार्यालयात आरोग्य तपासणी प्रसिध्द प्राकृतिक चिकित्सक डॉ. विजेता व चमुनी कन्हान शहरातील ३९ जेष्ठ, वयोवृध्द महिला, पुरूषांचे रक्तदाब, मधुमेह व नाडी तपासणी करून त्याना उपयुक्त औषधीचे निशुल्क वाटप करण्यात आले.
या जेष्ठ, वयोवृध्द नागरिकांना त्यांचे घरून ऑटोरिक्षाने आणुन त्याची आरोग्य तपासणी करून सर्वाना नास्ता, चाय देऊन त्यांच्या घरी नेऊन देण्या पर्यंतची सर्व सेवा संस्थे तर्फे करण्यात आली. शिबीराच्या यशस्वितेकरिता आयोजक माजी खासदार प्रकाश जाधव, दिलीप राईकवार, सचिन साळवी रुपेश सातपुते, पुरुषोत्तम येणेकर, हबीब शेख, गोविंद जुनघरे, संतोष गिरी, राजु गणोरकर, प्रशांत येलकर सह संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यानी सेवा देऊन मौलिक कार्य केले.