विजेच्या धक्क्याने मृत्यू : एक्सिस बँकेच्या विमा योजनेचा लाभ
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामध्ये (एनडीएस) कार्यरत मंगेश उरकुडे या मृत जवानाच्या कुटूंबियांना बुधवारी (ता.४) मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी एक्सिस बँकेतर्फे देण्यात आलेला ३८ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. मृतक मंगेश उरकुडे यांच्या पत्नी बबीता व दोन चिमुकल्या मुलींनी हा धनादेश स्वीकारला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक व उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, एक्सिस बँकेचे नागपूर सर्कल हेड राजीव कुमार, नागपूर ईस्ट क्लस्टर हेड निखील नाईक, नंदवन शाखा व्यवस्थापक अमोल लांबे, नागपूर सर्कल सॅलरी हेड श्रद्धा ठक्कर, नागपूर सर्कल क्लस्टर सॅलरी हेड भारत कतारपवार, रिलेशनशिप मॅनेजर अनुराग डोये, माजी सैनिक संघटनेचे छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान संगठन अध्यक्ष दिलीप सिंह सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
२५ मे २०२२ रोजी विजेच्या धक्क्याने ४० वर्षीय मंगेश उरकुडे या जवानाचा मृत्यू झाला. भारतीय सेनेच्या मराठा रेजिमेंट मधून निवृत्त मंगेश उरकुडे २०१९ पासून हनुमान नगर झोनमध्ये कार्यरत होते. उपद्रव शोध पथकाचे वेतन खाते एक्सिस बँकेमध्ये असून एक्सिस बँकेद्वारे पथकातील जवानांचा ४८ लाखांचा दुर्घटना विमा काढण्यात आला आहे.
विम्याच्या पहिल्या टप्प्याची रक्कम ३८ लाख रुपये मृत मंगेश उरकुडे यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आली असून उर्वरित १० लाख रूपये दुस-या टप्प्यात त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे एक्सिस बँकेच्या अधिका-यांद्वारे सांगण्यात आले आहे.
याप्रसंगी लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने, मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर उपस्थित होते.