– 179 शेतकऱ्यांची युनिक फर्मस् आडी साठी नोंदनी तर176राजस्व संबधीतीत अन्य प्रकरणे
कोंढाळी :- ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेद्वारे गाव नोंदणी अभियानाअंतर्गत 14फेब्रूवारी रोजी सकाळी 10-00वाजता पासून लाखोटीया भुतडा हायस्कूल येथे कोंढाळी राजस्व मंडळ तसेच मासोद राजस्व मंडळाचे शेतकर्यां साठी अॅग्रीस्टॅक योजनेच्या शिबिरा चे आयोजन करण्याण आले होते. या शीबीरात प्रत्येक शेतकऱ्याला युनिक फार्मर आयडी, बनवून देण्यासाठी इथे शीबीराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उपस्थित शेतकर्यां मार्गदर्शन करताना ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेबाबद माहिती देतांना कोंढाळी चे ना. तहसीलदार संजय भुजाडे यांनी सांगितले की ॲग्रीस्टॅक योजनेद्वारे गाव नोंदणी अभियानात प्रत्येक शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी, मिळणार आहे. या करिता कोंढाळी नायब तहसिलदार कार्यालयालया अंतर्गत कोंढाळी/मासोद राजस्व मंडळातील तील 14फेब्रूवारीला नोंदनी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला “ॲग्रीस्टॅक” योजनेद्वारे युनिक फार्मर आयडी दिला जाणार आहे. ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु, प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी, बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार ॲग्रीस्टॅक योजना देशातील प्रत्येक नागरिकाचा वेगळा आधार आयडी (क्रमांक) आहे… त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक “युनिक फार्मर आयडी” तयार केलं जाणार आहे.. केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी “ॲग्रीस्टॅक” योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या यूनिक फार्मर आयडी आणि त्यांच्या लँड रेकॉर्डला जोडण्याची ( लिंक करण्याची ) मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.. सध्या त्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असून लवकरच राज्यात गाव पातळीवर विशेष कॅम्प आयोजित करून एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे युनिक फार्मर आयडी तयार केले जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ याच “युनिक फार्मर आयडी” च्या माध्यमातून मिळणार आहे.. तसेच जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी ही भविष्यात हे युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांनी युनिक फार्मर आयडी तयार करून घेणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “ॲग्रीस्टॅक” योजने संदर्भात काटोल चे उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे तहसीलदार राजीव रणवीर यांनी माहिती दिली आहे.
14फेब्रूवारीला कोंढाळी व मासोद राजस्व मंडळातील179चे युनिक फर्मस् आडी ची नोंद तर 176शेतकऱ्यांचेराजस्व विभागाचे संबधीतीत या शिबिराचा लाभ घेतला असी माहिती ना त संजय भुजाडे व राजस्व मंडळ अधिकारी कुणाल पिंजदुरकर व सुरज साददकर यांनी दिली आहे.
या शिबीरा अधिकारी ग्राम कोंढाळी नायब तहसिलदार संजय भुजाड, राजस्व मंडळ अधिकारी सुरज साददकर मासोद राजस्व मंडळा अधिकारी कुणाल पिंजदुरकर यांनी केले आहे.
या शिबिराचे सफलतार्थ ग्राम अधिकारी अनिल दुनेदार, प्रेमराज गोहते, राजेश चव्हाण, रामानंद आवळे, ज्ञानेश्वरी दहिफळे,प्रिति चव्हाण,निता देशमुख,मयुरी लोहारे,सोबतच राजस्व(महसूल सेवक राजेंद्र सरोदे, दर्शन कोचे, दिपक हिंगवे, देविदास सोमकुवर आकाश पाटील त्याच प्रमाणे अधिकृत आधार संगणक संचालक निलेश फरकाडे, व संजय भोंगे, उमेश प्रजापती , प्रशांत चन्ने, अर्चना मस्के, तसेच सागर राऊत तसेच सहकारी रूपेश बूरडकर , राकेश पांडे व चंद्रशेखर चरडे यांनी मदत केली.