३४०५ लाभार्थ्यानी घेतला मनपाच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा विशेष शिबिरांचा’ लाभ

नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारा दहाही झोन निहाय आयोजित विशेष शिबिरांचा नागपूर शहरातील ३४०५ लाभार्थ्यानी लाभ घेत विकसित भारतासाठी ची शपथ घेतली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेतील योजनांची माहिती, प्रचार व प्रसिद्धीसाठी सुसज्ज व्हॅन्स अर्थात रथ मनपाच्या दहाही झोन मध्ये फिरत असून, विविध शिबीर घेत नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यात येत आहे. याअंतर्गत सकाळी ११ वाजता आणि दुपारी २ वाजता यावेळात विशेष शिबिर घेण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये ३४०५ नागरिकांनी भेट दिली असून, शिबिरातील आधार कार्ड विशेष शिबिराद्वारे १०५५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तर मनपाच्या आरोग्य विभागाच्या विशेष तपासणी शिबिराद्वारे ८६१ लाभार्थ्यांनी लाभ मिळविला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या शिबिराद्वारे ३१९ लाभार्थ्यांनी लाभ मिळविला आहे. आयुष्मान कार्ड शिबिराद्वारे शिबिराद्वारे ६६७ लाभार्थ्यांनी लाभ मिळविला आहे. पीएम स्वनिधी योजनेच्या विशेष शिबिराद्वारे ४९६ लाभार्थ्यांनी लाभ मिळविला आहे. तर मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत ३० हून अधिक लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

“विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, मनपाद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे.

मनपाद्वारे झोननिहाय पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना आणि ई-बस या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय शिबिरांमध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, पी.एम.स्वनिधी बद्दल माहिती तसेच असंसर्गजन्य आजार निदान व उपचार देखील दिल्या जात आहेत.

आमदार कृष्णा खोपडे यांच्याहस्ते लकडगंज झोनच्या विशेष शिबिराचे उद्घाटन

बुधवार (ता६) रोजी लकडगंज झोन येथील कच्चीविसा मैदान आणि त्रिमूर्ती नगर मैदान येथे आयोजित विशेष शिबिराचे उद्घाटन आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गांधीबाग मनपा सहायक आयुक्त गणेश राठोड, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, माजी नगरसेवक नरेंद्र(बाल्या) बोरकर उपस्थित होते. शिबिरात सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी उपस्थितांना “विकसित भारतासाठी”ची शपथ दिली. या विशेष शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत गुरुवार (ता.७) रोजी आशीनगर झोन येथील झोन कार्यालय आणि कमाल चौक बाजार क्षेत्र येथे आयोजित केल्या जाणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा प्रदेश कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

Thu Dec 7 , 2023
मुंबई :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार श्रीमती स्मिता वाघ, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, भाजपा मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश प्रवक्ता अवधूत वाघ, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.     Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!