सिरोंचा तालुक्यातील 334 पूरपिडीत लोकांचे शेल्टर होममध्ये स्थलांतर

 जिल्हा प्रशासनाद्वारे 58 शेल्टर होमची निर्मिती

 निवास, अल्पोपहार व जेवणाची सुविधा

गडचिरोली :- दि. 27 जुलै 2023 रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या पूरात अडकलेल्या व पुरामुळे धोका होऊ नये, अशा संभाव्य गावातील लोकांसाठी जिल्हा प्रशासनाने शेल्टर होम तयार केले आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा प्रशासनाने पूरपिडीत 334 लोकांना या शेल्टर होममध्ये स्थलांतरीत केले असून त्यांच्यासाठी निवास, अल्पोपहार व जेवणाची सुविधा जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे.

सिरोंचा तालुक्यात एकूण 58 शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक शेल्टर होममध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरपंच व उपसरपंच याप्रमाणे 58 पथक तयार करण्यात आले आहेत. दिनांक 27 जुलै 2023 ला सिरोंचा तालुक्यातील नगरम, मुगापूर, जानमपल्ली व सिरोंचा (रै.) येथील पुरबाधित लोकांना शेल्टर होममध्ये हलविण्यात आले आहेत. त्यामध्ये नगरम येथील 240 लोकांना शासकीय आश्रम शाळा, सिरोंचा येथील शेल्टर होममध्ये, मुगापूर व जानमपल्ली येथील 90 लोकांना कॉरमेल हायस्कुल राजीवनगर, सिरोंचा येथे तर सिरोंचा (रै.) येथील 4 लोकांना जिल्हा परिषद हायस्कुल, सिरोंचा येथील शेल्टर होममध्ये आणण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे नागरिकांच्या निवासाची, अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येत आहे.

याशिवाय तालुक्यात एस.डी.आर.एफ. चे एक पथक आणि सी.आर.पी.एफ. चे 50 जवान मौक्यावर तैनात आहेत. तसेच लाइफ जॅकेट, लाईफ बोट, मेगाफोन व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत लागणारे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व पूरबाधित गावांमध्ये आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रोटरी क्लब ऑफ नागपूर-ईशानेद्वारे ई-वेस्ट संकलन अभियान शुक्रवारपासून

Fri Jul 28 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने रोटरी क्‍लब ऑफ नागपूर ईशान्‍यद्वारे शुक्रवार २८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये ई-वेस्ट संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या संदर्भात नुकतेच रोटरी क्‍लब ऑफ नागपूर ईशान्‍यद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरद टावरी उपस्थित होते. रोटरी क्‍लब ऑफ नागपूर ईशान्‍यद्वारे पर्यावरण, आरोग्य आणि इतर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!