– थीम “ तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण ”
गडचिरोली :- राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कार्यक्रम तथा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली अंतर्गत आज बाह्य रुग्ण विभाग गडचिरोल येथे जागतिक तंबाखू विरोधी नकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिशकुमार सोळंके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, गडचिरोली, प्रमुख पाहूणे डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली. डॉ.इंद्रजीत नगदेवते, भीषक तज्ञ,डॉ. मनीष मेश्राम, भीषक तज्ञ, डॉ. सचिन हेमके, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. विनोद मशाखेत्री तालुका आरोग्य अधिकारी मुलचेरा, डॉ.चंद्रशेखर शानगोंडा दंतशल्य चिकित्सक, शंतनू पाटील, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी गडचिरोली, डॉ. राहुल ठिगळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा परिषद गडचिरोली, डॉ. दीक्षांत मेश्राम, आरोग्य वर्धिनी सल्लागार, श्रीमती आशा बावणे मेट्रन, डॉ. मृणली रामटेके रुग्णालयीन व्यवस्थापक, डॉ. स्वाती साठे, जिल्हा कार्यक्रम, समन्वयक NCD इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला तंबाखू व खर्रा तसेच बिडी, सिगारेट या सर्व व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यांमध्ये सुगंधित तंबाखू व खर्रा यांच्या पासून आजारांवर विपरीत परिणाम होत आहे. लहान मुलांना सुद्धा खर्रा खाण्याची सवय लागत आहे. पालक विद्यार्थाना तंबाखू व खर्रा घेण्याकरिता दुकानात पाठवत असल्यामुळे विद्यार्थानमध्ये खर्रा खाण्याचे प्रमाण दिसून येत आहेत. तसेच तरुण पिढी, महिला, यांच्यामध्ये तंबाखू व खर्रा खाण्याचे प्रमाण दिसून येत आहे. यामुळे तोंडाच्या कॅन्सर चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच मधुमेह, आणि बी. पी. कॅन्सर, मानसिक ताण तनाव सोबतच इतर आजार वाढत आहेत.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.इंद्रजीत नगदेवते, भीषक तज्ञ, डॉ. मनीष मेश्राम भीषक तज्ञ, डॉ. सचिन हेमके, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. विनोद मशाखेत्री तालुका आरोग्य अधिकारी, यांनी तंबाखू व खर्रा, धूम्रपान यापासून होणाऱ्या आजारांची सविस्तर माहिती दिली. कोटपा कायदा 2003 अंतर्गत कार्यवाही केली जाते. सर्व शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालयच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जाऊ नये. सर्व शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच नर्सिंग स्कूल, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील विद्यार्थिनी तंबाखू विरोधी पथनाट्य सादर केले. सर्व उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. चंद्रशेखर शानगोंडा दंतशल्य चिकित्सक, यांनी केली. गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू व खर्रा खाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मौखिक आरोग्य खराब होऊन बरा न होणारा पांढरा चट्टा लाल चट्टा, तोंड न उघडणे(osmf) या सारखे मुख पूर्व कर्करोगाचे लक्षण दिसून येतात. त्याचे रूपांतरण मुख कर्करोगामध्ये होत असतो. तसेच सर्व लोकांनी 6 महिन्याने तोंडाची तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच तंबाखू विरोधी कार्यक्रमाची अमल बजावणी करण्यात येते. शाळेमध्ये तंबाखू विरोधी मार्गदर्शन व तपासणी केली जाते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मीना दिवटे, सामाजिक कार्यकर्ता यांनी केले. कार्यक्रमाचे आभार राहुल कांकलनावार यांनी केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी दिनेश खोरगडे, मानसोपचार समुपदेशक, राहुल चावरे, विजय सिडम, वैशाली बोंबटे, आधीपरिचारिका, शिल्पा मेश्राम, प्रणाली ठेंगणे, शिल्पा सरकार तसेच सर्व एनसीडी टीम यांनी सहकार्य केले असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.